27-09-2016, 01:01 PM
सूर्यापासून उष्णता व प्रकाश या रूपाने येणाऱ्या ऊर्जेला सौर ऊर्जा असे म्हणतात. सौर ऊर्जेमुळे पृथ्वीवरील हवामानात बदल घडतात. सूर्यापासून पृथ्वीला १७४ पेटावॅट ऊर्जा मिळते. यातली सुमारे ३०% परावर्तित होते तर उरलेली वातावरणात शोषली जाते. या ऊर्जेमुळे वातावरण व जमीन तापते. वातावरण तापल्यामुळे समुद्र तापतो व पाण्याचे बाष्पीभवन होऊन वातावरणाचे चक्र सुरू राहते. सूर्यप्रकाश हे पृथ्वीवर प्रकाश मिळवण्यासाठीचा मुख्य स्रोत आहे